प्रादेशिक कार्यालय,अमरावती

                        व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत या विभागामध्ये खालीलप्रमाणे मुख्य योजना सुरु आहे.

1. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना (औद्योगिक प्रशिक्षण संस्था)
2. शिकाऊ उमेदवारी योजना (कारखान्यातील शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षण)
3. पुर्व व्यावसायीक अभ्यासक्रम अभ्यासक्रम (तंत्र माध्यमिक शाळा)
4. +2 स्तरावरील व्यावसायीक अभ्यासक्रम
5. +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसायाचे अभ्यासक्रम H.S.C.(Vocational)
6. प्रगत व्यवसाय शिक्षण पध्दती
7. महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाचे व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
8. आदीवासी रोजगारभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण अंतर्गत आश्रम शाळा- औ.प्र.संस्था व तांत्रिक विद्यालय
9. आर्टिझ्न टु टेक्नोक्रॅट
10. सेंटर ऑफ एक्सलंस (CEO)
11. अनुसूचित जातीसाठी उच्चस्तर औ.प्र. संस्था
12. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप
13. जागतिक बँकेअंतर्गत दर्जावाढ
तसेच इतर योजना राबविल्या जातात.
1. लोकसेवा केंद्र
2. मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण
3. राष्ट्रीय सेवा योजना
4. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना
या शैक्षणिक येाजनेचा समावेश आहे.
       अमरावती विभागातील या सर्व योजनांचे प्रशासकीय व व्यवस्थापकीय नियमन संचालनालयाच्या वतीने या प्रादेशिक कार्यालयाद्वारे केले जातात.
औद्योगिक घटकांना निरनिराळया प्रकारच्या स्तरावर लागणारे प्रशिक्षित व मनुष्यबळ व त्यांच्या प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने
नियोजनपुर्वक व जाणीवपुर्वक प्रयत्न
या विभागांमार्फत सुरु आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधुन देण्यात येणारे प्रशिक्षण उद्योग समुहांना
पुरक असावे म्हणून निदेशक वर्गाना औद्योगिक कारखान्यांत प्रशिक्षणांसाठी पाठविणे,आधुनिक
यंत्रसामुग्रीची ओळख करुन देणे व त्यावर
प्रशिक्षण देणे इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात येतात.