सन 2024-25 चे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र तयार करण्यासाठी माहिती सादर करण्याबाबत

या कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या अशासकीय अनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू असलेल्या भविष्य निर्वाह निधी खाते अद्यावत करुन सन 2024-25 चे विवरणपत्र तयार करायचे आहे.  करीता आपल्या संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची सन 2024-25 मध्ये कपात करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीबाबतची खालील प्रमाणे माहिती दिनांक 10/04/2025 पर्यंत न चुकता या कार्यालयास सादर करावी अन्यथा माहे एप्रिल-2025 चे वेतन देयके स्विकाल्या जाणार नाही.

  1. विवरणपत्रातील माहिती
  2. सन 2023-24 च्या विवरणपत्राची प्रत
  3. सन 2024-25 मध्ये वेतन देयकात कपात करण्यात आलेल्या वर्गणीच्या 12 महिण्याच्या शेडयुलची प्रत
  4. अग्रिम मंजुर झाले असल्यास अग्रिम आदेशाची प्रत.