प्रादेशिक कार्यालय,अमरावती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत या विभागामध्ये खालीलप्रमाणे मुख्य योजना सुरु आहे.
अमरावती विभागातील या सर्व योजनांचे प्रशासकीय व व्यवस्थापकीय नियमन संचालनालयाच्या वतीने या प्रादेशिक कार्यालयाद्वारे केले जातात.
औद्योगिक घटकांना निरनिराळया प्रकारच्या स्तरावर लागणारे प्रशिक्षित व मनुष्यबळ व त्यांच्या प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने
नियोजनपुर्वक व जाणीवपुर्वक प्रयत्न
या विभागांमार्फत सुरु आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधुन देण्यात येणारे प्रशिक्षण उद्योग समुहांना
पुरक असावे म्हणून निदेशक वर्गाना औद्योगिक कारखान्यांत प्रशिक्षणांसाठी पाठविणे,आधुनिक
यंत्रसामुग्रीची ओळख करुन देणे व त्यावर
प्रशिक्षण देणे इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात येतात.
